पिंपरी ः महानगरपालिकेची माहे फेब्रवारी महिन्याची तहकूब मा.महापालिका सभा बुधवार दिनांक २६/०२/२००२ रोजी पार पडली. या सभेमध्ये सभाशास्राचे सर्व नियम धाब्यावर बसवून कामकाज करण्यात आले आहे. या सभेमध्ये केवळ चार मिनिटांत अठरा विषय व पाच उपसुचना विषयांचे वाचन न करताच मंजुर करण्यात आले तसेच या उपसुचना न मांडता त्या उपसुचनांना सुचक अनुमोदनही कोणत्याही नगरसदस्यांने दिले नाही, तरी त्या मंजुर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुमारे साडेसातशे कोटींच्या उपसुचनांच्या वैधतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्या तांत्रिकदृष्टया बेकायदेशीर ठरतात. कोट्यावधी रुपयांच्या उपसुचना घुसडण्यासाठी सत्ताधारी भाजपने सुनियोजित सभागृहामध्ये गोंधळ घालून उपसुचना न वाचताच घुसडण्यात आल्या आहेत. याबाबत आम्ही त्याच दिवशी पत्राव्दारे दिलेल्या उपसुचनांच्या प्रतींची मागणी केली आहे. परंतु अद्याप प्रशासनाकडेही या उपसुचना आलेल्या नाहीत. त्यामुळे यामध्ये नक्कीच गोलमोल आहे त्यामुळे या उपसुचना रद्द करण्यात याव्यात अशी आमची आग्रही मागणी आहे.
सत्ताधारी भाजपची बहुमताच्या जोरावर सर्वसाधारण सभेत हुकूमशाही