पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०२०-२१ या आर्थिक वर्षांचा मूळ ५२३२ कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह ६ हजार ६२८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सोमवारी (दि. १७) रोजी स्थायी समितीला सादर केला.
सभापती विलास मडिगेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत आयुक्त श्रावण हर्डीकर , अतिरिक्त आयुक्तसंतोष पाटील , अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेचा हा ३८ वा अर्थसंकल्प आहे. तर, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचा तीसरा अर्थसंकल्प सादर केला आहे.
अर्थसंकल्पातील ठळक तरतूदी :-
प्रभाग क्र. २ बो-हाडेवाडी, विनायकनगर, मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे पुतळा शिल्प उभारणे. वेंगसरकर अकॅडमी येथे पॅव्हेलीयनचे काम करणे. थेरगांव येथे खेळाचे मैदान विकसित करणे. पिंपळे सौदागर आरक्षण क्रमांक ३६२ येथे खेळाचे मैदान विकसित करणे. पिंपळे सौदागर आरक्षण क्रमांक ३६७ येथे खेळाचे मैदान विकसित करणे या कामांसाठी एकूण तरतूद र. रु. ११ कोटी ८५ लाख.
म.न.पा.च्या विकासकामासाठी रु. १४०६.९० कोटी इतकी भरीव रकमेची क्षेत्रीय स्तरावरील विकासकामांसाठी तरतूद. अ क्षेत्रीय कार्यालय- रु. ४३. २८ कोटी, ब क्षेत्रीय कार्यालय- रु. ४५. ९६ कोटी. क क्षेत्रीय कार्यालय- रु. ४४. ०५ कोटी. ड क्षेत्रीय कार्यालय- रु. २०. ०२ कोटी. इ क्षेत्रीय कार्यालय- रु. १८. ११ कोटी. फ क्षेत्रीय कार्यालय- रु. १६. ७० कोटी. ह क्षेत्रीय कार्यालय- रु. २०. ०७ कोटी.
विशेष योजना अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना या लेखाशिर्षावर रु.११६१ . ९५ कोटी तरतूद प्रस्तावित शहरी गरीबांसाठी (BSUP) अंदाजपत्रक तरतूद रु ११३६. ०४ कोटी जेंडर बजेट- महिलांच्या विविध योजनांसाठी भरीव तरतूद रु. ३९.५६ कोटी महापौर विकासनिधीसाठी तरतूद रु. ५. ३५ कोटी. दिव्यांग कल्याणकारी योजना तरतूद रु. ३५ कोटी. पाणीपुरवठा विशेष निधी रु. २१७ कोटी. PMPML करीता अंदाजपत्रकात रु. २४४ कोटींची तरतूद नगररचना भू-संपादना करीता रु. १५० कोटी तरतूद अतिक्रमण निर्मुलन व्यवस्थेकरीता रु. २. ७५ कोटी तरतूद. स्वच्छ भारत मिशनसाठी रु. १ कोटी तरतूद. स्मार्ट सिटीसाठी रु. १५० कोटी तरतूद. प्रधानमंत्री आवास योजना रु. ७० कोटी तरतूद. अमृत योजनेसाठी रु. ८१. ९२ कोटी तरतूद. पाणीपुरवठा विभागासाठी रु. ४०० कोटी कर्ज रोखे. मेट्रोसाठी रु. ५० कोटी.
प्रभाग क्रमांक १० पिंपरी येथील स नं . ३१ / १ – १ येथे दिव्यांगांसाठी कल्याणकारी केंद्र बांधणे. आकुर्डी येथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय बांधणे. थेरगांव सर्वे नं. ९ येथे बहुउद्देशीय इमारत बांधणे तसेच जिजामाता हॉस्पिटल पिंपरी येथे नविन इमारत बांधणे या कामासाठी एकूण तरतूद र. रु. १७ कोटी ९५ लाख. वाकड भुजबळ वस्तीमध्ये डीपी रस्ता विकसित करणे र.रु. ४ कोटी, ताथवडे येथील शनी मंदिराकडून मारुजीगावाकडे जाणारा डीपी रस्ता विकसित करणे, र. रु. ५ कोटी, ताथवडे गावठाणापासून पुनावळेकडे जाणारा डीपी रस्ता विकसित करणे र. रु. ४ कोटी.
सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात र. रू. ५,२३२.५७ कोटी (आरंभिच्या शिल्लकेसह) उत्पन्न अपेक्षित आहे व त्यात प्रत्यक्षात खर्च र. रू. ५२२६.८० कोटी होईल व मार्च २०२१ अखेर र. रू. ५.७७ कोटी इतकी शिल्लक राहील.